होमी भाभा

होमी भाभा

होमी जहांगीर भाभा
Homi Jehangir Bhabha.jpg
होमी जहांगीर भाभा
पूर्ण नावहोमी जहांगीर भाभा
जन्मऑक्टोबर ३०इ.स. १९०९
मुंबईमहाराष्ट्रभारत
मृत्यूजानेवारी २४इ.स. १९६६
माँत ब्यांकोइटली
निवासस्थानभारत Flag of India.svg
नागरिकत्वभारतीय
राष्ट्रीयत्वभारतीय Flag of India.svg
धर्मपारशी
कार्यक्षेत्रभौतिकशास्त्रज्ञ
कार्यसंस्थाकॅव्हेंडिश लॅबोरेटरी,
टाटा मूलभूत संशोधन संस्था,
भारतीय अणुऊर्जा आयोग
प्रशिक्षणकेंब्रिज विद्यापीठ
डॉक्टरेटचे मार्गदर्शकपॉल डिरॅक Nobel prize medal.svg
ख्यातीभारतीय अणू संशोधन
पुरस्कारपद्मभूषण(इ.स. १९५४)
वडीलजहांगीर होरमजी भाभा
आईमेहेरबाई
होमी भाभा (इ.स. १९०९ - इ.स. १९६६) भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ होते. भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकासकार्यक्रमाचे प्रणेता मानले जाते.

जीवन[संपादन]

भाभा यांचा जन्म सधन पारशी कुटुंबात झाला. वडील जहांगीर भाभा हे बॅरिस्टर होते. पुस्तकांची आवड असल्यामुळे घरातच खूप पुस्तके गोळा केली होती. त्यात विज्ञान विषयाचीही पुस्तके होती. होमी भाभा यांना या पुस्तकांमुळे विज्ञानात स्वाभाविकपणेच आवड निर्माण झाली. शिवाय त्यांना कवितेचा आणि चित्रकलेचा छंद होता. अतिशय सुंदर, देखणे व्यक्तिमत्त्व लाभालेले होमी भाभा उत्तम वक्ताही होते.
त्यांचे प्राथमिक ते पदवी पर्यंतचे शिक्षण मुंबई येथे झाले. होमी यांनी पुढे इंजिनियर व्हावे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. पण होमी यांनी वडिलांना आपल्याला गणित आणि भौतिक शास्त्रेच विशेष आवडतात असे ठामपणे सांगितले. वडिलांनी हो-ना करत गणिताचा सखोल अभ्यास करण्यास परवानगी दिली पण आधी प्रथम श्रेणीत इंजिनियरिंगची पदवी प्राप्‍त करण्याची अट घालून दिली. वडिलांनी परवानगी दिल्यावर होमी भाभा केंब्रिज विद्यापिठातून इ.स. १९३० साली प्रथम श्रेणीत इंजिनियर झाले. तसेच पॉल डिरॅक यांच्या मार्गदर्शनाखाली गणिताचा अभ्यासही करीत राहिले. त्या काळात त्यांना शिष्यवृत्ती आणि अनेक बक्षीसेही मिळाली.
इ.स. १९४० साली भारतात परत आल्यावर काही काळ डॉ. भाभा यांनी भारतीय विज्ञान संस्था, बंगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले. इ.स. १९४५ साली टाटा मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना करण्यात मदत केली आणि आपले संशोधन कार्य संभाळून डॉ. भाभा टाटा मूलभूत संशोधन संस्थेचे संचालक झाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर इ.स. १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणु उर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. याही संस्थेचे तेच संचालक म्हणून काम पाहू लागले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारत देशात अणु भट्टी ची स्थापना होऊ शकली. अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्रच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक. डॉ. भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणु भट्या सुरू करून त्यांचा विज निर्मितीसाठी उपयोग केला तसेच १८ मे, इ.स. १९७४ या दिवशी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला.

निधन[संपादन]

संयुक्त राष्ट्रच्या सभेला जातांना २४ जानेवारी, इ.स. १९६६ या दिवशी फ्रान्सच्या हद्दीत असतांना त्यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर ट्रॉम्बे येथील अणू संशोधन केंद्राचे नाव बदलून भाभा अणू संशोधन केंद्र असे ठेवण्यात आले.

भाभांवरील पुस्तके[संपादन]

  • भारताची अणुगाथा - आल्हाद आपटे. भारतातील अणुसंशोधन आणि अणुउर्जा संशोधनातील भाभा आणि त्यांच्यानंतरच्या भारतीय अणुसंशोधकांच्या योगदानाचे वर्णन असलेले पुस्तक

Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पानविस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

No comments:

Post a Comment

  पोषण आहार नोंदवही २०२३