जगदीशचंद्र बोस

जगदीशचंद्र बोस

(जगदीश चंद्र बोस या पानावरून पुनर्निर्देशित)
जगदीशचंद्र बोस
डॉ. (सर)जगदीशचंद्र बसु (बंगाली:জগদীশচন্দ্র বসু) (१८५८-१९३७) हे एक भारतीय जीवशास्त्रज्ञभौतिकशास्त्रज्ञवनस्पतीशास्त्रज्ञ तसेच पुरातत्त्वज्ञ होते.

जन्म व बालपण[संपादन]

पूर्व बंगालमधील डाक्का जिल्ह्यातील राणीखल या खेडेगावात ३० नोव्हेंबर १८५८ रोजी जगदीशचंद्र बोस यांच्या जन्म झाला. त्यांचे वडील भगवानचंद्र बसू हे सरकारी नोकरीत सब डिव्हिजनला आॅफिसर होते. त्या काळी इंग्रजीत जसे ठाकूरचे टागोर झाले, राय आडनावाचे रे झाले तसेच बसू आडनावाचे इंग्रजी स्पेलिंग बोस झाले.
जगदीशचंद्रांचे घराणे हे बंगाल प्रांतातील एक खानदानी घराणे होते. त्यांची आई साध्वी व सुशील होती. लहानपणापासूनच जगदीशचंद्र आजूबाजूचा निसर्गपहायचे, त्याचे निरीक्षण करायचे. निसर्गातील अनेक गोष्टी पाहून त्या अशाच का, असा प्रश्न त्यांना पडे. भगवानचंद्र सुद्धा न कंटाळता छोट्या जगदीशने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत असे. सर्व झाडे एकाच वेळी का फुले देत नाहीत? एखाद्या झाडाची पालवी पोपटी हिरवी पण दुसर्‍याची तांबूस? असा फरक का पडतो असे त्यांना वाटे. झाडे, फुले, फुलपाखरे, भोवतीचा निसर्ग यांचे निरीक्षण करणे हा त्यांचा आवडता छंद होता.

शिक्षण[संपादन]

डॉ. जगदीशचंद्र बोस कोलकाता येथील सेंट झेवियर शाळा आणि त्याच नावाच्या महाविद्यालयात शिकले. त्यानंतर इंग्लंडच्या ख्राईस्ट चर्च महाविद्यालयातून भौतिकी, रसायन वनस्पतिशास्त्र आणि निसर्गविज्ञानाचा अभ्यास पुरा करून ते भारतात परत आले. या काळात त्यांना भौतिकशास्त्रज्ञ लॉर्ड रॅली यांचे मार्गदर्शन लाभले.
बोस यांनी १८९७ मध्ये बनविलेले मायक्रोवेव्ह निर्मितीचे उपकरण

विद्युतशक्तीवरील संशोधन[संपादन]

इंग्लंड व कोलकाता येथील प्रेसिडेन्सी महाविद्यालयात १८८५ ते १९१५ अशी ३० वर्षे भौतिकशास्त्र शिकवत असतानाच जगदीशचंद्रांनी विद्युतशक्तीवरसंशोधन केले. विद्युत चुंबकीय तरंगांचा शोध घेऊन त्यांनी बॅटरी बनवली. या शोधाची कीर्ती सर्वदूर पसरली. प्रसिद्ध शास्त्रज्ञ पोइंकर आणि जे. जे. थॉम्पसन यांच्या लिखाणात या शोधाचा उल्लेख आला आहे. नेमेलाइटच्या मदतीने संदेश पाठवण्यात त्यांना यश मिळाले होते.
.इ.स. 1896 मध्ये रेडिओ संदेश वहनाचे प्रयोग  मार्कोनीने केले.व त्या आधी 1895 मध्ये जगदीशचंद्रांनी ते केेले. हे आता अमेरिकेत मान्य.{१}

संदर्भ व नोंदी ==[संपादन]

१ . लेले य .शं. , इतिहासातील सुवर्णकण

वनस्पती शास्त्रातील संशोधन[संपादन]

वनस्पती शास्त्रातील संशोधन[संपादन]

विद्युतशक्तीवरील संशोधनानंतर बोस हे वनस्पतिशास्त्राकडे वळले. सचेतन आणि अचेतन वस्तूतील साम्य आणि भेद याचा त्यांनी अभ्यास केला. स्नायूमज्जातंतू, सुखदु:ख आदी विकार यांचा वनस्पतीबाबत त्यांनी धांडोळा घेतला. डायामेट्रिकल कोन्ट्रॅक्शन अ‍ॅपरेटस, रेझोनंट रेकॉर्डर्स ही दोन उपकरणे वनवून त्यांनी त्यांच्या साहाय्याने थंडी, प्रकाश, विद्युतउष्णता या घटकांचा वनस्पती व प्राणी यांच्यावरील परिणामांचा अभ्यास केला. वनस्पतींचे श्वसनरुधिराभिसरण पद्धतीने होणारे त्यांच्यातील कार्य, अन्नाची ने-आण निरुपयोगी वस्तूंचा निचरा हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. वनस्पतीमध्ये होणार्‍या सूक्ष्म बदलांची माहिती ठेवून त्याच्या नियमित नोंदी त्यांनी ठेवल्या. त्यावर संशोधन केले. त्यांच्या याच संशोधनातून ‘वनस्पतींना संवेदना असतात’ हे त्यांनी सिद्ध केले. भारतीय वैज्ञानिक सोहिनी चक्रबोर्ती यांनी २०१६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या संशोधनातून हि प्रक्रिया उलगडून दाखविली आहे.[१] [२] वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी रेझोनंट रेकॉर्डर, ऑसिलेटिंग रेकॉर्डर, कंपाऊंड लेव्हलर, क्रेसकोग्राफ, बॅलिन्सिंग अ‍ॅपरेट्स आदी उपकरणे तयार केली

संस्थास्थापना आणि लेखन[संपादन]

जगदीशचंद्र बोस यांनी सन १९१७मध्ये कोलकाता येथे बोस रिसर्च इन्स्टिट्यूट नावाची संस्था स्थापन करून एक मुखपत्रही सुरू केले.

लिहिलेली पुस्तके[संपादन]

  • इरिटेबिलिटी ऑफ प्लँट्स
  • इलेक्ट्रो-फिजिओलॉजी ऑफ प्लँट्स
  • ट्रॉपिक मुव्हमेंट ॲन्ड ग्रोथ ऑफ प्लँट्स
  • दि नव्‍‌र्हस मेकॅनिझम ऑफ प्लँट्स
  • प्लँट रिस्पॉन्स (१९०६)
  • दि फिजिऑलॉजी ऑफ फोटोसिंथेसिस
  • दि मोटार मेकॅनिझम ऑफ प्लँट्स
  • रिस्पॉन्सेस इन द लिव्हिंग ॲन्ड नॉन लिव्हिंग (१९०६)
  • लाइफ मुव्हमेंट्स ऑफ प्लँट्स (भाग १ ते ४)

No comments:

Post a Comment

  पोषण आहार नोंदवही २०२३